धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये बहिणीचं लग्न सुरू असतानाच भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नात आनंदाचे वातावरण असतानाच सगळीकडे आक्रोश सुरू झाला.
रोहित थोरात (वय २३, रा.
सांगवी, शिरपूर, धुळे) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी त्याची मोठी बहीण राणीचं लग्न होतं. बहिणीच्या लग्नात तो धावपळ करत होता. लग्नाची पंगत सुरू असताना तो काहीतरी आणण्यासाठी महामार्ग ओलांडत होता. यावेळी रस्त्यावरून सुसाट वेगाने आलेल्या कंटेनरने त्याला धडक दिली. यातच रोहितचा जागीच मृत्यू झाला. रोहितच्या मृत्यूची बातमी समोर येताच लग्नात एकच आक्रोश झाला.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास नवरीचा लहान भाऊ रोहित थोरात हा मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडून नवी सांगवी बाजारपेठेत काहीतरी वस्तू घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. धडक इतकी भयंकर होती, की रोहितचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
The post हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

