Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी.

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी.

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली. 17 मे रोजी वैष्णवीचे वडील यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

लेकीच्या सुखासाठी सासरच्या मंडळींचे हट्ट पुरवणे असो किंवा आता तिला न्याय मिळवण्यासाठी वडील अनिल कस्पटे धडपड दिसत आहे. पण त्याच कमनशिबी बापाला वाढदिवसाच्या दिवशी लेकीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आहे. लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाल्यानंतर हात जोडून ओक्साबोक्सी रडले. सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली. 17 मे रोजी वैष्णवीचे वडील यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हगवणे कुटुंबीय फरार असल्याने वैष्णवीची अंत्यसंस्कार माहेरी करण्यात आले. वैष्णवीच्या मृतदेहाला वडिलांना अग्नी डाग द्यावा लागला. अनिल कस्पटे वैष्णवीला निरोप देताना ओक्साबोक्शी रडत होते. मला बर्थडेच रिटर्न गिफ्ट असं कसं दिलं बाळा, असे म्हणत वडिलांनी टाहो फोडला होता. हगवणे कुटुंबाच्या त्या वकिलाला एकच सांगायचंय-साहेब तुम्ही सुज्ञ आहात, काहीही आरोप करू नका, तुम्हालाही मुलगी असेल… माझी मुलगी गेलीये, ती मेलीये, तिच्या चारित्र्यावर संशय उडवू नका, असे म्हणत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

The post हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka