Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! चिमुकलीला गळफास देऊन बापानी केली आत्महत्या.

हृदयद्रावक! चिमुकलीला गळफास देऊन बापानी केली आत्महत्या.

लातूर : चिमुकलीला गळफास देऊन बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे मोतीनगर भागात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

मार्केट यार्डाच्या दक्षिण गेटच्या समोर भुतडा कुटुंबीय राहते.

यांचे याच परिसरात कोरे गार्डनसमोर इडली गृह आहे. अभय लखन भुतडा (वय 35) हा इडली गृहातून जवळच असलेल्या घरी आला होता. मुलीला इडली देतो व शाळेत नेऊन सोडतो असे सांगितले. घरी आल्यानंतर त्याने स्वतःच्या सहा वर्षे वयाच्या मुलीस अगोदर गळफास देऊन तिला ठार केले व स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेच्या वेळी अभय भुतडा यांची पत्नी याच परिसरात असलेल्या माहेरी गेली होती. आर्थिक कारणावरून त्याने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलिसानी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post हृदयद्रावक! चिमुकलीला गळफास देऊन बापानी केली आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka