Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू.

हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू.

वतमाळ : यवतमाळच्या डोंगरखर्डा येथे पाहुणे बनून आलेले दोन मावस भावांचा धुळवडीच्या दिवशी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृत भावांची नावे आहेत. दोघे जण इतर सहा जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते. आठ पैकी पाच जण अचानक पाण्यात बुडू लागले. इतर तीन जणांनी स्वत:ला वाचवलं. पण दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या डोंगरखर्डा येथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणावर ही घटना घडली आहे.

दोघे मावस भाऊ हे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. दोघांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता. याबाबतचा पुढील तपास कळंब पोलिस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka