Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू.

हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू.

ळगाव: लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गुजरातच्या वापीहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन अकोल्याकडे परतणाऱ्या क्रूझर वाहनाला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव जवळ भीषण अपघात झाला.

या अपघातात नववधू पूजा वाघळकर (वय २२) हिच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चिमुरड्यासह ६ जण मृत्यूशी झुंज देत आहेत.

अकोला येथील पूजा रवी वाघळकर हिचा विवाह गुजरात मधील वापी येथे पार पडला होता. लग्नानंतर प्रथमच माहेरी ओवाळणीसाठी पूजा आपल्या नातेवाईकांसह क्रूझरने (क्रमांक MH 30 AZ 4710) अकोल्याकडे येत होती. बुधवारी (ता. २९) सकाळी ९ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ ही गाडी आली असता, अचानक गाडीचे पुढचे चाक निखळले. वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही क्रूझर समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन जोरात धडकली.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अपघात इतका भीषण होता की क्रूझर वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये नववधू पूजा वाघळकर (वय २२), तिचे नातेवाईक दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच वाघळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात प्रेम वाकडकर, नितेश काठोडे, अमोल गीते, रवी वाघोडकर आणि तुळशीराम भागवत यांच्यासह अंश काठोडे (वय १४) हे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतल्याने जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले, मात्र या अपघाताने अकोला आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…

हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…

हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka