Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू.

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू.

डचिरोली : विवाहानंतर फिरायला गेलेल्या नवरदेवाचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. नवनीत राजेंद्र धात्रक (वय 27, रा.

चंद्रपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला. बादल श्यामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी असे दुसऱ्या मृत व्यक्तीचे नाव आहे.

नवनीत हा लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत फिरायला गेला होता. तेव्हाच तो पाण्यात बुडू लागला. तो पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी बादल हेमके धावले. यावेळी या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक होते. ते भामरागड येथे राहत होते. हेमके आणि धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले असताना ही घटना घडली आहे. यामुळे घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

The post हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka