नाशिक: विहिरीवर पाणी आणायला गेलेल्या मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगावमध्ये घडली आहे. निताबाई जाधव आणि त्यांची मुलगी इच्छामणी असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत.
मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे पाणी भरायला आणि कपडे धुण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या. त्यावेळी विहिरीतील पाणी काढत असताना पाय घसरून मुलगी विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी आईने उडी मारली. पण दोघीही बुडून मृत्यूमुखी पडल्या. शेळ्या-मेंढ्या चारणारे घरी परतत असताना त्यांच्या लक्षात ही बाब आली. स्थानिकांनी त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, पोलीसात या प्रकऱणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, मायलेकींचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला होता. परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
The post हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

