Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण.

हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण.

सोलापूर : बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात बुडताना चिमुकल्याला वाचवले. पण, यामध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धामणगाव येथे रविवारी (ता.

५) दुपारी 2 च्या सुमारास हि हृदयद्रवक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अरुण उर्फ डेव्हीड सतीश बनसोडे (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डेव्हीड आणि त्यांचा मुलगा अनुग्रह (वय ६) हा धामणगाव दुमाला येथील नागझरी नदीवर असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्याजवळ नदी पाहण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी अनुग्रहचा पाय घसरून तो पाण्यात पडला. वडील डेव्हीड बनसोडे यांनी तत्काळ पाण्यात उडी मारली आणि अनुग्रहला पाण्याच्या बाहेर ढकलले. मात्र स्वतःला पाण्याच्या प्रवाहात पोहता न आल्याने गटांगळ्या खात ते पाण्यात बुडाले. यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी डेव्हीड याना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.

दरम्यान, डेव्हीड यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर बार्शीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पाण्यात बुडालेल्या चिमुकल्या अनुग्रहला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. बार्शीत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.

हृदयद्रावक! आईच्या कुशीतून उचलून नेत बाळाला ड्रममध्ये बुडवून मारलं अन्…

हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…

हृदयद्रावक! माझ्या जिवलग मित्रांनो, माझी जाण्याची वेळ आली आहे…

हृदयद्रावक! नवजात बाळाला रस्त्यावर फेकले; थंडीत गारठलं, कुत्र्याने लचके तोडले तरीही…

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू…

The post हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka