Dailyhunt
हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण.

हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण.

नाशिक: नाशिक शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

जयश्री सोनवणे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. जयश्री सोनवणे ही युवती तिच्या भावासोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात जयश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ सुमित सोनवणे जखमी झाला आहे.

यानंतर त्या भरधाव पिकअपने आणखी दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या दुर्घटनेत दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवकही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलिसांनी अपघातानंतर पिकअप चालकाला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले की, वाहन चालवताना त्याच्या मांडीवर बसलेल्या मुलाने अ‍ॅक्सेलेरेटरवर पाय दिल्यामुळे गाडीचा वेग अचानक वाढला आणि त्यामुळे अपघात झाला. मात्र, अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या प्रकरणाची नोंद म्हसरूळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नाशिक शहर पोलिस :

The post हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka