Dailyhunt
हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन.

हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन.

नाशिक: पोलिस खात्यात काम करणाऱ्या आपल्या आईला उद्देशून भावनिक चिठ्ठी लिहून मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पूजा दीप डांबरे (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. यावर्षी बारावी पास झाल्यानंतर तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. नियमीतपणे ती कॉलेजला जात होती. मात्र, अचानक तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिक्षणाचा खर्च अधिक असल्याने पुजाने आत्महत्या केल्याची प्राथमिक तपासात समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पूजाचे वडील तिच्या आईपासून विभक्त झाले आहेत. ती आपल्या आईसह नाशिकमधील बिडी कामगारनगर अमृतधाम येथे राहत होती. आई, माझ्या शिक्षणाचा तुला त्रास नको. माझ्यामुळे तुझी धावपळ होते. तू टेन्शन नको घेऊ अशी चिठ्ठी लिहून पुजाने आत्महत्या केली आहे. पुजाची आई पोलिस खात्यात महिला पोलिस अंमलदार पदावर कार्यरत आहे.

पुजाने घरामध्ये कोणी नसताना आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आईला शिक्षणाचा खर्च जमवताना त्रास होतो, यामुळे तरुणीने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक शहर पोलिस :

The post हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka