मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील एका शेततळ्यामध्ये शुक्रवारी (ता. २४) दुपारच्या सुमारास चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
राधिका नितीन केदारी (वय 14, राहणार कानेवाडी ता. खेड), श्रद्धा काळू नवले (वय वर्ष 13), सायली काळू नवले (वय 11वर्ष), दीपक दत्ता मधे (रा. कानेवाडी ता. खेड) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. सध्या सर्व राहणार थोरात मळा निरगुडसर हे सर्व मुले दुपारच्या वेळेस आंब्याच्या झाडाखाली खेळत असताना ही घटना घडली. सुरज नवले या मुलाने सांगितल्यानंतर नवले पती पत्नीने बुडालेल्या मुलांना तळ्यातून बाहेर काढले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ॲम्बुलन्स मध्ये मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील कांबळे, डॉ श्वेता गोराणे, डॉ अर्जुन दिघे यांनी सर्वांना तपासणी करत मुले मृत झाल्याचे घोषित केले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे, पारगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील, संचालक नामदेव थोरात यांनी कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांना आधार दिला. यातील श्रद्धा व सायली या दोन्ही मुलींना गोरक्षनाथ बबन कवठे (रा. जवळे बाळेश्वर ता. संगमनेर जि.अहमदनगर) त्यांनी दत्तक घेतली होती. हे सर्व मुले पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिकत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे व निरगुडसर गावचे पोलिस पाटील विठ्ठल वळसे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…
उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…
हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू…
पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

