Dailyhunt
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन.

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन.

पुणे : कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून शिक्षक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी (वय 24) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

चिराग व प्रा.पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या शिक्षक दांपत्याचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.

चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीन वर्ष गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक, नाट्य लेखक, कवी सुद्धा होते. त्यांनी लेखन केलेल्या नाटकाचा शालेय जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. ते अतिशय संवेदनशील, शिस्तप्रिय शिक्षक असल्याची माहिती त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दिली. त्यांच्या पत्नी प्रा .पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.

बुधवारी (ता. 1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग व प्रा. पल्लवी हे दुचाकी वरून येथील वारूळवाडी-ठाकरवाडी रस्त्यावरील डिंभे डावा कालव्यावरील पुलावर आले होते. त्यांनी दुचाकी पुलावर उभी केली. या वेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणातच ते दिसेनासे झाले.

शिक्षक दाम्पत्याने कालव्यात उडी मारल्याची माहिती वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिली. चिराग शेळके यांचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात यश आले. मात्र अंधार पडल्याने प्रा. पल्लवी यांचा शोध घेता आला नाही.

दरम्यान, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी डिंभे डावा कालव्यातील पाणी कमी केले. गुरुवारी (ता. २) सकाळी नऊ वाण्याच्या सुमारास प्रा. पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. दुपारी दोघांच्या मृतदेहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीप्ती कळबकर यांच्या उपस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

हृदयद्रावक! विद्यार्थ्याने पेपर लिहिता लिहिताच घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! प्रियकरासाठी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

The post हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka