Dailyhunt
हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली.

हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली.

धाराशिव : महाविद्यालयाच्या निरोप समारंभात भाषण करत असतानाच चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

वर्षा खरात असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही क्षण आधी स्टेजवर बोलत असलेली वर्षा हसत हसतच खाली पडली अन् तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

परंडा येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभात भाषण करत असताना वर्षा खरात हिला चक्कर येऊन ती स्टेजवर कोसळली आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनीचे बीएससीच्या वर्गात शिक्षण घेत होती. कार्यक्रमादरम्यान वर्षा स्टेजवर भाषण करत होती. हसत-हसत सर्वांशी बोलत होती ते शेवटचंच ठरले आहे. विनोद करत विद्यार्थ्यांना हसवत असताना अचानकच तिला भोवळ आली आणि खाली ती कोसळली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, वर्षाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचे असू शकते, मात्र अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी या प्रसंगावर हळहळ व्यक्त केली आहे. वर्षाच्या अकाली निधनाने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिक यांनाही मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना वर्षा म्हणाली होती, "प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढं जमेल तेवढं शिकतो," असं ती म्हणाली त्यानंतर ती विनोद करत वर्गाला हसवलं होती. काही क्षणातच तिच्या आयुष्याचा असा शेवट झाला, ही बाब काळजाला चटका लावणारी आहे.

दरम्यान, वर्षा खरात हिची ओपन हार्ट सर्जरी लहानपणीच झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला हृदयाचा त्रास होता. मात्र शाळेत वावरत असताना कधी ती आजारी असल्याचे जाणवले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. हसत खेळत वावरणाऱ्या वर्षाला अचानक मृत्यूने कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षा खरात हिचे आई वडील शेती व्यवसाय करत असून घरी एक बहीण आणि भाऊ असा परिवार आहे, वर्षाच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka