Dailyhunt
IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या.

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या.

चंदीगड : हरियाणाचे सहाय्यक पोलिस महासंचालक आणि 2001 या बॅचचे IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी घरात्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाय. पूरन कुमार यांची पत्नी सध्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेल्या आहेत. सैनी यांच्याबरोबर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ सध्या जपान दौऱ्यावर आहे. पूरन यांची पत्नी या शिष्टमंडळाच्या सदस्या आहेत. दरम्यान पोलिसांनी पूरन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नऊ पानांची सुसाइट नोटही लिहिली आहे. पोलिसांनी सुसाईट नोट ताब्यात घेतली आहे. पूरन यांनी एवढा धक्कादायक पाऊल का उचललं यामागील कारण पोलिस शोधत आहेत. वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येमुळे हरियाणात खळबळ माजली आहे.

पूरन कुमार यांच्या आत्महत्येची घटना सोमवारी घडली असून मंगळवारी त्यांच्या घरात बेसमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मुलीने त्यांना रक्ताच्या थारोळ्यात माखलेले पाहिलं आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

चंदीगडच्या एसएसपी कंवरदीप कौर यांनी सांगितले की, दुपारी 1.30 वाजता सेक्टर 11 पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. आम्ही येथे पोहोचलो तेव्हा आम्हाला आढळले की आत्महत्या झाल्याची तक्रार आहे. आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळला. शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समजू शकेल. आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार हे सध्या सुनारिया येथील पोलिस ट्रेनिंग कॉलेजमध्ये कार्यरत होते.

The post IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka