जालना : शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार वर्षीय चिमुकली जखमी झाली आहे.
मंठा शहरातील देवी रोडवर शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सीमा चव्हाण (वय 24), मारिया पठाण (वय 6) आणि रूपला राठोड (वय 65) यांचा मृत्यू झाला आहे. तर इशिका चव्हाण (वय ४) ही मुलगी जखमी झाली आहे. या घटनेनेनंतर आयशर चालक फरार झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, भीषण अपघातात तीन निष्पाप लोकांचा बळी गेल्याने मंठा शहरासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन कडक शिक्षा करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post जालन्यात भीषण अपघात! चिमुकलीसह तिघांचा मृत्यू; चालक फरार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

