Dailyhunt
कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात.

कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात.

बीड : वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा युवकांची नावे आहेत.

धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो? म्हणून अशोक मोहिते याला वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात अशोक मोहिते गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केज शहरातील चौकात अशोक मोहितेव याच्यावर हा हल्ला केला आहे.

हल्लेखोरांनी लोखंडी पाईप आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. शिवाय, त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली. संतोष देशमुख प्रकरणाच्या बातम्या पाहिल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आम्हाला दिली गेली. हे आरोपी आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत', असा आरोप अशोक मोहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. अशोक मोहिते याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता. पोलिसांनी तपास करत दोघांना कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या करताना सरपंचाला हालहाल करुन मारण्यात आले. त्यानंतर बीडमधील खंडणी, दहशत, टोळ्यांचे राज्य समोर आले आहे.

The post कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka