Dailyhunt
कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी 'निर्भया'ला मिळाला न्याय.

कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी 'निर्भया'ला मिळाला न्याय.

कोलकाता: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर सत्र न्यायालय आज (शनिवार) निकाल दिला आहे. कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या संजय रॉयवर गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरवरील गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

या प्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे.

शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून तिचा जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर देश हादरला होता.

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय यांना दोषी ठरवले आहे. यावेळी पीडितेचे आई-वडीलही न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. संजय रॉय यांना सोमवारी (20 जानेवारी 2025) शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कर येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह अनेक जखमांच्या खुणा असलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

आरोपी संजयने न्यायाधीशांना सांगितले की, ‘मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. मी हे केलेले नाही. ज्यांनी हे केले त्यांना सोडले जात आहे. यात एक आयपीएस अधिकारी देखील सहभागी आहे.’

आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ६४,६६, १०३/१ लावण्यात आल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. तो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये गेला आणि तिथे आराम करत असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून मारहाण करून तिची हत्या केली, अशी तक्रार आरोपीविरुद्ध आहे. डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉय विरुद्धच्या खटल्याची सुनावणी 9 जानेवारी रोजी पूर्ण झाली, त्यादरम्यान 50 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था असावी या मागणीसाठी कोलकाता येथील कनिष्ठ डॉक्टरांनी दीर्घकाळ आंदोलन केले होते.

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

शंकास्पद! कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरच्या शरीरात 150mg वीर्य…

डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…

The post कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी ‘निर्भया’ला मिळाला न्याय… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka