Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार.

कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार.

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शहरातील जवाहर नगरात सरनाईक वसाहतीत रविवारी (ता. २१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सहा ते सात जणांनी शाद शौकत मुजावर याच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार केले.

या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहे.

शाद मुजावर त्याच्या मित्रांसोबत रविराी रात्री घराजवळ असलेल्या कट्ट्यावर बसला होता. त्यावेळी चारचाकी आणि दुचाकीवरून आलेल्या सहा ते सात जण आले. त्यांनी शादच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी शादच्या मांडीत घुसली. तर दोन गोळ्यांचा नेम चुकल्याने शाद वाचला. शाद शौकतवर सहा ते सात जणांनी गोळीबारासह कोयत्यासारख्या धारदार शस्त्रानेही हल्ला केला. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला पण त्यामधून तो वाचला. मात्र गोळी लागून तो जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, शाद हा चारचाकी गाड्या आणि जमीन खरेदी विक्री करण्याचे काम करतो. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

The post कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka