कोल्हापूर : कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सादिक मुजावर असे आरोपी मुलाचे नाव आहे तर शहनाज मुजावर असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.
सादिक हा पत्नीसोबत फोनवर बोलत होता. मात्र त्याची आई मध्येच बोलल्यामुळे त्याला राग आला, याच रागाच्या भरात त्याने आईच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर सुऱ्याने वार करत हत्या केली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राजारामपुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
The post कोल्हापूर हादरले! मुलाने सुऱ्याने वार करत केली आईची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

