कोल्हापूर : गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
इम्रान इमाम मुजावर (वय ३२, रा. आराम कॉर्नर, शिवाजी रोड, कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोल्हापूरच्या मटण मार्केटजवळ हातगाडी लावण्यावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हातगाडी लावण्यावरून इम्रान इमाम मुजावर (वय ३२, रा. आराम कॉर्नर, शिवाजी रोड, कोल्हापूर) याच्यावर आराम कॉर्नर भागामध्ये चाकूने हल्ला करण्यात आला. जखमी झालेल्या इम्रान मुजावरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयीत आरोपी यूसुफ अलमसजीत याला राजावाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
The post कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच चाकूने भोसकलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

