कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून डॉक्टरसह तीन एजंटना करवीर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. युवराज गोविंद चव्हाण, संजय कृष्णात पाटील आणि डॉक्टर हर्षल रवींद्र परुळेकर, विजय लक्ष्मण कोळसकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
विजय कोळस्कर आणि हर्षल नाईक हे डॉक्टर असल्याचं सांगत होते. चिखली परिसरात त्यांनी रुग्णांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर गारगोटी परिसरात गर्भपात केला. गर्भपात करण्याच्या एक दिवस आधी युवराज रुग्णांना गोळ्या देत असल्याचे उघडकीस आले आहे. गर्भपात प्रकरणी पोलिसांनी छापा टाकला असता सोनोग्राफी मशीन, इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चव्हाण याला तीन दिवसांची तर इतर आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मडिलगे खुर्द येथे विजय कोळसकर याच्या घरी एका महिलेला गर्भपातासाठी गोळ्या देत असताना पोलिसांनी छापा टाकला. सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले. चिखली-आंबेवाडी परिसरात गर्भपाताच्या गोळ्यांची अनधिकृत विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. युवराज चव्हाणला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे गर्भपाताच्या गोळ्यांची पाकिटे सापडली. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लहान मुलांच्या चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; आठ नवजात बाळांची सुटका…
हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…
The post कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टरसह चौघांना अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

