पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत कोयता बाळगणा-या तडीपार आरोपीला तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोंढवा पोलिस ठाणे कडून तडीपार करण्यात आलेल्या आरोपी यांचा शोध घेवून मिळून आल्यास कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी आदेशीत केले होते.
सदर बातमीप्रमाणे तपास पथकातील स्टाफ असे मिळाले माहीती प्रमाणे बातमीच्या ठिकाणी काकडेवस्ती लेन नं.३ समोर पी. जे. के. एम. स्कुलच्या शेजारील चालू बाधंकाम बिल्डींग येथे गेले असता एक जण झोपलेला दिसुन आला. सदर झोपलेल्या इसमा जवळ जावुन खात्री केली असता आरोपी अरबाज अहमद पटेल (वय २० वर्षे, रा. पवार हाईट्स तिसरा मजला फलॅट नं. ३०२, काकडेवस्ती, कोंढवा पुणे) हा झोपलेला मिळुन आला. त्यास ताब्यात असताना त्याच्या अंथरुणाखाली एक लोखंडी सतुर सारखे हत्यार ठेवलेले मिळुन आले सदर हत्यार त्याच्याकडुन जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी यास पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले असताना तो कायदेशीर परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग करुन पुणे शहराचे हद्दीत विनापरवाना प्रवेश करुन लोखंडी सतुर हे शस्त्र जवळ बाळगले असताना मिळून आला आहे. म्हणुन त्याच्या विरुध्द कोंढवा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त.परि.०५ आर. राजा, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग शाहुराव साळवे कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, पोलिस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.
कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…
कोंढवा पोलिसांना नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसला अन् गुन्हे केले उघड…
कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…
कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीला कोयत्यासह केले जेरबंद… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

