Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश.

कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश.

बीड : मस्साजोग (ता. केज) गावचे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तब्बल 70 दिवस झाले, पण तो पोलिसांना सापडलेला नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने केली आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच कृष्णा आंधळे यांची संपत्ती जप्त करणे एक प्रक्रियेचा भाग आहे. मात्र कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी, असेही ते म्हणाले आहेत. ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल. तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपातीपणे चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत, असेही देशमुख म्हणाले आहेत.

दरम्यान, संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी खून झाला होता तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता. तसेच याबाबतची माहिती देखील सादर केली होती. यामध्ये कृष्ण आंधळे यांच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत. सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

The post कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka