पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात निलेश घायवळ बाबत अहवाल सादर केला होता.
पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.
निलेश घायवळ याने खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढला अन् लंडनला पळाला आहे. निलेश घायवळ याने गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. पोलिसांनी तपास केल्यानंतर हे पुरावे पासपोर्ट ऑफिसला पाठवले होते. त्यानंतर कार्यलयाकडून कारवाई करत निलेश घायवाळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
निलेश घायवळ याने नावात बदल करून 'घायवळ'ऐवजी 'गायवळ' असे नमूद केले आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. घायवळने Ghaywal या नावातील h काढून Gaywal असे केले. त्यामुळे मोठे गुन्हे दाखल असताना देखील घायवळला पासपोर्टमुळे फरार होता आले आहे.
Loading…
The post कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अखेर मोठा दणका… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

