Dailyhunt
'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप.

'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप.

वी दिल्ली: 'कुमकुम भाग्य' आणि 'देवो के देव महादेव' यांसारख्या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डॉली सोही हिचे कर्क रोगाने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिची कर्करोगाशी झुंज सुरू होती.

मात्र, ही झुंज अपयशी ठरली. डॉलीच्या निधना आधीच तिची बहीण अमनदीपचे कावीळने निधन झाले. अमनदीप ही देखील अभिनेत्री होती. दोन्ही मुलीच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेत्री डॉली सोही हिच्या कुटुंबाने त्यांच्या मुलीच्या निधनाची माहिती एका निवेदनाद्वारे जारी केली आहे. त्यांनी लिहिले, ‘आमची मुलगी डॉली हिचे आज सकाळी निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने आम्हाला पूर्ण धक्का बसला आहे. आज तिच्यावर अंत्य संस्कार केले जातील.”

दरम्यान, ‘भाभी’, ‘कलश’, ‘देवो के देव महादेव’ सारखे कार्यक्रमातून अभिनेत्री डॉली सोही घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही दिवसांपासून सर्वाइकल कॅन्सरसोबत तिच्यावर उपचार सुरू होते. डॉलीने अखेरचा श्वास घेण्याआधी काही तासांपूर्वी गुरुवारी रात्री तिची बहीण अमनदीप सोही हिचे कावीळच्या आजाराने निधन झाले. अमनदीप सोही ही देखील अभिनेत्री होती. 2000 साली तिने कलश या मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर कमास, कुसुम, भाभी, तुझ संग प्रीत लगाई सजना, हिटलर दीदी, देवों के देव महादेव आदी मालिकेत ती झळकली होती. झनक या मालिकेत ती शेवटची झळकली होती.

अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…

अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…

'देवमाणूस' फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…

The post ‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka