लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्न करुन परतत असताना कारने ऑटोला धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात नवरा-नवरीसह सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये झारखंडमधील लग्नातून परतणाऱ्या वधू-वरांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री 2 वाजता राष्ट्रीय महामार्ग-74 वर हा भीषण अपघात झाला. झारखंडहून येणाऱ्या रेल्वेने हे कुटुंब घरी परतत होते. सर्वजण मुरादाबाद स्टेशनवर उतरले आणि तेथून ऑटोने बिजनौरच्या धामपूरला जात होते. पाठीमागून आलेल्या एका कारने ऑटोला धडक दिली. ऑटो रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. अपघात स्थळापासून वराचे घर अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
बिजनौरच्या तिबरी गावात राहणाऱ्या विशालचे झारखंडमध्ये 14 नोव्हेंबरला लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर शुक्रवारी ते कुटुंबासह गावी परतत होते. त्याच्यासोबत विशाल, त्याची पत्नी खुशी, काकू रुबी, काका मुमताज, चुलत बहीण बुशरा आणि इतर दोन कुटुंबीय तिथे होते. या अपघातात खुर्शीद (65), विशाल (25), खुशी (22), मुमताज (45), रुबी (42), बुशरा (10) आणि ऑटोचालक अजब यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…
जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…
हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…
नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…
हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…
The post लग्न करुन परतताना भीषण अपघात; नवरा-नवरीसह 7 जणांचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

