कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
गडहिंग्लजमध्ये पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग केला. याबाबतची माहिती शेजारच्यांना समजल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडून जवानाची सुटका केली आहे. अमर देसाई असे जवानाचे नाव आहे. अत्यावस्थ जवानाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.
दरम्यान, विषप्रयोग करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post लष्करातील जवानाचे हातपाय बांधून पत्नीने केला विषप्रयोग… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

