पुणे : पोलिस शिपाई ते पोलिस निरिक्षकपदापर्यंतच्या पोलिस कर्मचार्यांना राज्यशासनाकडून वर्षभरासाठी ३० अर्जित रजा दिल्या जातात. मात्र, दैनंदिन कामकाज तसेच बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था राखने यामुळे या सुट्टया पोलिस कर्मचार्यांना घेता येत नाहीत.
अर्जित रजा रोखीकरण म्हणजे काय ?
राज्यातील इतर शासकीय कर्मचार्यांप्रमाणे पोलिसांना प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी नसते. सणांच्या दिवशीही त्यांना सुट्टी नसते. त्यांना आठवडयात केवळ एक साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे त्यांना इतर विभागां प्रमाणे वर्षाला 30 दिवस हक्काच्या (अर्जित) रजा आहेत. मात्र, कामाचा व्याप तसेच सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांना या रजा वापरता येत नाहीत. त्यामुळे शासनाने त्यांना 1989 मध्ये वर्षाला असलेल्या या रजांमधील 15 दिवसांच्या रजेच्या रोखीकरणाची सवलत दिली आहे.
या रजा शासनास परत करून त्या दिवसांचे पैसे पोलिसांना मिळतात. मात्र, राज्याच्या गृह विभागाने 21 फेब्रुवारीला अचानक ही सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही बाब चूकीची असल्याचे लक्षात आल्याने गृह विभागाने सवलत पुन्हा कायम ठेवली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर बंधने…
महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर; पाहा नावे…
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…
राज्यात होणार 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती: गृहमंत्री
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post महाराष्ट्र गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

