Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश.

महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुकलीवर (वय ३) अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला.

त्यावेळी एकच आक्रोश झाला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

डोंगराळे गावात 16 नोव्हेंबर रोजी गावातील विजय संजय खैरनर (वय २४) याने चिमुकलीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. पोलिस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत.

प्राथमिक तपासात, आरोपी विजय खैरनार याचे मुलीच्या वडिलांसोबत एक महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग या आरोपीच्या मनात होता. यानंतर नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केले आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपील 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. आरोपीवर तातडीने फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी महिलांनी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह…

चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी…

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

हृदयद्रावक! चिमुकलीने मागितले चॉकलेट अन् दारूड्या बापाने घेतला जीव…

संतापजनक! प्रेयसीच्या चिमुकलीवर अत्याचार; गुप्तांगात टाकला स्क्रू ड्रायव्हर अन्…

Loading…

The post महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka