Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! चिमुकलीने मागितले चॉकलेट अन् दारूड्या बापाने घेतला जीव.

हृदयद्रावक! चिमुकलीने मागितले चॉकलेट अन् दारूड्या बापाने घेतला जीव.

लातूर : लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका बापाने केवळ चॉकलेट मागितल्याच्या कारणातून आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरुषी बालाजी राठोड (वय ४) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बालाजी बाबू राठोड असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बालाजी याला दारुचं व्यसन आहे. तो अनेकदा दारु पिऊन पत्नीला त्रास द्यायचा, मारहाण करायचा. आरोपीच्या त्रासाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी पत्नी आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी गेली होती. पण ९ जून रोजी आरोपी आपल्या सासुरवाडीला गेला. त्याने जबरदस्ती करत चिमुकलीला आपल्या घरी घेऊन आला. तेव्हा पासून आरुषी वडिलांसोबत राहत होती.

नातेवाईकांनी अनेकदा बालाजीला समजावून सांगितले. मुलीला तिच्या आईकडे नेऊन सोडण्याची विनंती केली. पण त्याने ऐकले नाही. रविवारी दुपारी चिमुकल्या आरुषीने आपल्या वडिलांकडे चॉकलेटसाठी पैसे मागितले. या रागातून बालाजीने राहत्या घरात साडीने आरुषीचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला. हत्येची ही घटना घडल्यानंतर रविवारी दुपारी अडीच वाजता सासू मंगलबाई बाबू राठोड यांनी वर्षाच्या काकांच्या मोबाईलवर फोन करून आरुषीच्या हत्येची माहिती दिली.

चिमुकल्या मुलीचा बापाने जीव घेतल्याचे समजताच आईल मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने उदगीर येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मुलीला मृत पाहून त्यांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी मृत मुलीची आई वर्षा राठोड यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांनी आरोपी बालाजी राठोड याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या, पाहा नावे…

अमरावती! पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येचे कारण आलं समोर…

धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या…

काकू अन् चुलत भावाला कुऱ्हाडीनं संपवलं अन् आरोपीनं…

'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला हिचा मृत्यू; स्वप्न राहिले अपूर्ण…

महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या…

The post हृदयद्रावक! चिमुकलीने मागितले चॉकलेट अन् दारूड्या बापाने घेतला जीव… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka