Dailyhunt
महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार.

महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार.

बीड: नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गुन्हा आंबेजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या घटनेचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलिस करत आहेत.

बारामती तालुक्यातील महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने फिर्यादीशी संपर्क साधला. आपल्या कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असे आमिष बदामबाईने दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने मुलीला पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र मुलीला अंबाजोगाई येथील ‘पायल कलाकेंद्र’ येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील लॉजवर नेण्यात आले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले आणि ती निघून गेली. लॉजवर उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कलाकेंद्र येथे आणून सोडण्यात आले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अत्याचारानंतर पीडितेने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला परत बारामतीला आणले. यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! लातूरमध्ये इन्शुरन्साठी दाखवला स्वतःचा 'मृत्यू'; लिफ्ट मागणाऱ्यालाच जाळलं जिवंत…

हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…

DSP कल्पना वर्मा यांचे चॅटिंग व्हायरल झाल्याने खळबळ…

व्यावसायिकाला Video Call केला अन् महिला लागली कपडे काढू…

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka