Dailyhunt
महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या.

महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या.

. संभाजीनगर: वैजापूर येथील एका आश्रमात महिला कीर्तनकार ह.ब.प. संगीताताई महाराज यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 27) रात्रीच्या सुमारास समोर आली आहे.

या हत्येमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

वैजापुरातील एका आश्रमात संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…

बीडच्या क्लासमध्ये मुलीचं लैंगिक शोषण; केबिनमध्ये बोलावायचे अन् नको ते…

पुणे शहरात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; पाहा गुन्हे…

इन्स्टाग्रामवर ओळख! पहिल्याच भेटीत केली शारिरीक सुखाची मागणी अन्…

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

The post महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka