Dailyhunt
महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार.

महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार.

नागपूर: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असतानाच आता नागपूरमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला आहे.

या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपी भोंदूला बेड्या ठोकल्या आहेत.

ताहीर बेग (वय ६५) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याने पीडित विवाहितेवर पूजा करण्याच्या आणि आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने अत्याचार केला आहे. याप्रकरणी नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी भोंदूबाबाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याला अमरावती येथून अटक केली आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पीडित विवाहित महिला नागपूर येथील रहिवासी आहे. ती एका खासगी संस्थेत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिचा पती ऑक्टोबर महिन्यापासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेऊनही पती सापडत नसल्याने त्या हवालदिल झाल्या आहेत. एका विवाह समारंभात तिची आरोपी भोंदू बाबाशी ओळख झाली. तिने आपली हकीकत आरोपीला सांगितली. यानंतर आरोपी भोंदूने नवऱ्याला परत आणण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले.

आरोपी भोंदूबाबाने पूजा घालण्याच्या नावाखाली महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. शिवाय, अत्याचाराची वाच्यता केल्यास देवाचा प्रकोप होईल, अशी भीतीही त्याने दाखवली. पीडित महिलेने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार केली. रितसर गुन्हा दाखल होताच नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी अमरावतीतून भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…

महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड; महिलेवर अत्याचार…

भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka