मुंबई: मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या संध्या पाठक हिचा कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. खाली पडल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
ही आत्महत्या होती की अपघात? यावर चर्चा सुरु होत्या. पोलिसांना संध्याच्या मोबाईल मेसेजमधून हा धक्कादायक उलगडा झाला आहे.
साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी संध्या पाठक (वय २१, रा. नालासोपारा) हिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. पोलिसांनी संध्याचे जवळचे मित्र मैत्रिण, शिक्षक वर्ग तसेच घरच्यांकडे चौकशी केली. तसेच चौकशीच्या अनुशंगाने संध्याचा मोबाईलदेखील पोलिसांनी घेतला होता. यानंतर एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याचा उलगडा पोलिसांना झाला आहे. तसेच पोलिसांना तिच्या बॅगेत नैराश्येवरील काही औषधेदेखील सापडली आहेत. अधिक पुरावे मिळविण्यासाठी तिचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.
संध्या पाठक ही विलेपार्लेतील साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्गात शिकत होती. गुरूवारी सकाळी 7 वाजता महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून संध्याने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर तिच्याकडे कुठल्याही प्रकारची चिठ्ठी सापडली नव्हती. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. संध्याच्या मृत्यूनंतर विलेपार्ले पोलिसांनी तिचा मोबाइल आणि बॅग ताब्यात घेतली होती. संध्याने एका मुलाला पाठवलेले अनेक मेसेजेस तिच्या मोबाईलमध्ये पोलिसांना मिळाले. तसेच संध्याच्या बॅगमध्ये नैराश्यावरील गोळ्या सापडल्या. यातून हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याची शक्यता विलेपार्ले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
संध्याने आत्महत्येपुर्वी एका मुलाच्या मोबाईलवर अनेक मेसेज पाठवले होते. पोलिसांकडून आता त्या मुलाची चौकशी केली जाणार आहे. त्याचाही जबाब पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! मुंबईतील महाविद्यालयात युवतीचा मृत्यू; हत्या की आत्महत्या…
धक्कादायक! कॅबमध्ये महिला पायलटच्या मांडीवरून एकाने फिरवला हात तर…
युवकाने भररस्त्यात युवतीला काठीने केली मारहाण; इतर मुलांशी का बोलतेस…
अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…
पुणे शहरात महिलेने चिमुकल्यासह टेरेसवरून मारली उडी; चिठ्ठीत लिहिले…
The post महाविद्यालयीन युवती संध्या पाठक हिच्या आत्महत्येचं खरं कारण समोर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

