Dailyhunt
महिला डॉक्टरने तणाव आणि निराशेतून केली आत्महत्या.

महिला डॉक्टरने तणाव आणि निराशेतून केली आत्महत्या.

सांगली : मुंबईतील एका महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ आपल्या गाडीत आत्महत्या केली आहे. डॉ. शुभांगी समीर वानखेडे (वय 44) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, त्या मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील ईएसआयसी हॉस्पिटल क्वार्टर्समध्ये राहत होत्या.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली घडली. डॉ. शुभांगी यांनी आपल्या गाडी (MH 03 AR 1896) मध्ये बसून ब्लेडने गळा आणि डावा हात कापून आत्महत्या केली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्या गाडीतच बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.

डॉ. शुभांगी या मंगळवारी सकाळी दवाखान्यात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या, मात्र त्या थेट कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलचा संपर्क तुटला होता. गाडी विठ्ठलवाडी परिसरात उभी असलेली आढळली. गाडीच्या मागील बाजूस शुभांगी वानखेडे रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या. घटनेची माहिती समजताच पोलिस दाखल झाले त्यांनी शुभांगी यांना तातडीने इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांचे ओळखपत्र आणि रक्ताचे डाग आढळून आले. शुभांगी यांच्यामागे पती समीर वानखेडे (डॉक्टर), एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, कोरोनानंतर शुभांगी या व्यावसायिक तणावात होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या निराश होत्या, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपासाची प्रतीक्षा आहे. डॉक्टर शुभांगी यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात आणि कुटुंबात शोककळा पसरली आहे.

पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…

पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

शिक्षकाने केलेला अपमान विद्यार्थ्याच्या लागला जिव्हारी; चिठ्ठीत लिहिले की…

The post महिला डॉक्टरने तणाव आणि निराशेतून केली आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka