Dailyhunt
महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप.

महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप.

ठाणेः महिला पोलिस हवालदाराच्या मुलाने वसंत विहार येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मोहित खापरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

‘आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसून प्रेमप्रकरणातील अपयशाने हा निर्णय घेतला’ अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहित हा गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घरातील पंख्याला ओढणीच्या सहायाने आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मोहितची आई कापूरबावडी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. आई ड्युटीवर तर वडीलही बाहेर गेले होते. त्याची चुलत बहीण त्यांच्याकडे काही कामानिमित्त आली. त्यावेळी मोहितने गळफास घेतल्याचे समोर झाले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रेमप्रकरणातील अपयशाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे तपासात आढळले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

The post महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka