Dailyhunt
माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध.

माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध.

मुंबई : वादग्रस्त माजी IAS अधिकारी दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी (ता. ६) बेलापूर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील आणि रबाळे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीप खेडकरला जामीन दिल्यास केसवर परिणाम होवू शकतो असा युक्तिवाद केला.

मनोरमा खेडकरला जामीन मिळूनही तपासात सहकार्य करीत नसल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. यानंतर न्यायालयाने जामीनावरील निकाल 8 ऑक्टोबरपर्यंत पर्यंत राखून ठेवला आहा.

नवी मुंबईच्या रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मिक्सर क्लिनर प्रल्हाद कुमार या तरुणाच्या अपहरणात मुख्य आरोपी दिलीप खेडकर, प्रफुल्ल साळुंखे आणि मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रफुल्ल साळुंखेला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी दिलीप खेडकर अद्याप फरार आहे. त्याला जामीन मिळावा यासाठी बेलापूर कोर्टात सोमवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेण्यात आल्या.

रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलीप खेडकरच्या जामीनाला जोरदार विरोध केला. यावेळी त्यांनी खेडकर आणि परिवारावर याआधी असलेल्या गंभीर गुन्हांचा पाढा वाचला. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दिलीप खेडकरला जामीन दिल्यास याचा केसवर परिणाम होवू शकतो. फिर्यादीवर दबाव येवू शकतो असे स्पष्ट केले. आरोपीने घरातील डीव्हीआर (CCTV रेकॉर्डिंग) गायब केले आहेत. गुन्ह्यातील गाडी आणि मोबाईल फोन लपवण्यात आले आहेत. क्लिनरच्या अपहरणानंतर आरोपींनी रात्री कोणाशी संवाद साधला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या कारणांमुळे पोलिसांनी आरोपींना पोलीस कस्टडीत घेऊन तपास करण्याची गरज असल्याचे न्यायालयास सांगितले आहे.

पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर जामीन मिळाल्यानंतरही तपासात सहकार्य करीत नाहीत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत चौकशीसाठीची वेळ असताना वेळ गेल्यानंतर चौकशीसाठी उशीरा येत आहेत. सुर्यास्तानंतर महिलेची चौकशी करण्यास कायद्याने मनाई असल्याचे याचा फायदा मनोरमा खेडकर घेत आहे.

पोलिसांनी न्यायालयात म्हटले की, 13 सप्टेंबर रोजी रबाळे परिसरात लँड क्रूझर आणि मिक्सरमध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर दिलीप खेडकर यांनी मिक्सर चालकावर हल्ला करून त्याला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवले. त्याला पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी, मोबाइल हिसकावून घेऊन पुण्यातील आपल्या बंगल्यात नेऊन तळघरात डांबून ठेवले. पोलिस लोकेशनच्या आधारे तिथे पोहोचले असता, मनोरमा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून बाहेर कुत्रे सोडले आणि पोलिसांना आत येण्यापासून परावृत्त केले. या कारवाई दरम्यान दिलीप खेडकर, ड्रायव्हर साळुंखे आणि गुन्ह्यातील गाडी आतमध्ये असतानाही पोलिसांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर पोलिस स्टेशनला येतो असे सांगून आरोपी फरार झाले. आरोपी उच्चशिक्षित असले तरी त्यांनी कायद्याचा गैरवापर केला आहे. त्यांनी केलेली कृत्ये संघटित गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. तपासाला ते अजिबात सहकार्य करत नाहीत आणि पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे सत्यशोधनासाठी त्यांना पोलीस कोठडीत घेणे अत्यावश्यक आहे.

रबाळे पोलीस स्टेशनचे तपास पथक या प्रकरणात सतत चौकशी करत असून, दिल्ली, पुणे आणि नवी मुंबई या तिन्ही ठिकाणी तपासाचा विस्तार केला जात आहे. न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय होणार असून, पोलिसांचा दावा आहे की आरोपींना जामीन मिळाल्यास तपासावर गंभीर परिणाम होईल.

The post माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka