Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माजी पोलिस अधिकाऱ्याचा बॅडमिंटन खेळताना कोर्टवरच मृत्यू.

माजी पोलिस अधिकाऱ्याचा बॅडमिंटन खेळताना कोर्टवरच मृत्यू.

भंडारा : भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर बॅडमिंटन खेळत असताना सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बाजीराव चिंधालोरे (वय 60) असे सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. झंवर यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला होता.

बाजीराव चिंधालोरे यांना बॅडमिंटन खेळण्याची आवड होती. सेवानिवृत्तीनंतर ते बॅडमिंटन कोर्टवर यायचे, बॅडमिंटन खेळ खेळायचे. मात्र, आज अचानक खेळता-खेळता ते खाली कोसळले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. भंडारा शहरातील शिवाजी महाराज स्टेडियमवर ही दुर्घटना घडली आहे. रोज उत्साहात खेळणारे बाजीराव चिंधलारे खेळताना एकदत तंदुरुस्त आणि फिट होते. विशेष म्हणजे त्यांची शरीरयष्टी पाहून असा काही प्रकार घडेल असे कोणालाही वाटत नाही. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

The post माजी पोलिस अधिकाऱ्याचा बॅडमिंटन खेळताना कोर्टवरच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka