Dailyhunt
मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक.

मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक.

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सिंहगड रोडवरील कुख्यात गुंड चेतन लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दिनांक २१/१०/२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक, सुरेश जायभाय, पोलिस हवालदार ६७१८ गिरीगोसावी, सोबत सी आर मोबाईलवर वरील पोलिस हवालदार / ७७६० मालुसरे व पोलिस शिपाई /१०१३८ सागर असे सिंहगड रोड पोलिस स्टेशन, पुणे शहर अंकित वडगाव पोलिस चौकीचे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलिस शिपाई /१०१३८ सागर यानां त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, कॅनोल रोड तुकाई नगर जवळ, वडगाव, पुणे येथे कॅनोलचे कडेला दोन जण गावठी पिस्टल घेवून थांबलेले आहेत. पोलिस शिपाई /१०१३८ सागर यांनी सुरेश जायभाय, पोलिस उपनिरीक्षक यांना सांगितले असता, सुरेश जायभाय, पोलिस उपनिरीक्षक यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगडरोड पोलिस ठाणे, पुणे शहर यांना कळविली. त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.

कॅनोल रोड तुकाई नगर जवळ, वडगाव, पुणे येथे कॅनोलचे बाजूला दोन जण उभे असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून पळून जाऊ लागल्याने स्टाफचे मदतीने त्यांचा पाठलाग करुन काही अंतरावर त्यांना २०.३० वा. चे सुमारास पकडले. सुरज महेंद्र नांगरे (वय २१, रा. किरकटवाडी, समाज मंदिर पाठीमागे, ता- हवेली जि. पुणे), साहील मनिष सोनवणे (वय २२ वर्षे रा.मु.पो. किरकटवाडी, ता- हवेली जि. पुणे) अशी दोघांची नावे आहेत. अंगझडतीत सुरज महेंद्र नांगरे याच्या उजवे कमरेजवळ पॅन्टचे आतमध्ये कोचलेले एक देशी बनावटीचे एक पिस्टल व मॅगझीन व साहील मनिष सोनवणे याचे पॅन्टचे डावे खिशात त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे मिळाली आहे. तेव्हा त्यांचेकडे सदरचे शस्त्र परवान्याबाबत विचारपूस करता त्याने शस्त्र परवाना नसल्याचे सांगीतले. तरी त्यांचे विरूध्द पोलिस हवालदार ६७१८ गिरीगोसावी यांनी आर्म अॅक्ट कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे तक्रार दिलेली असुन सुरेश जायभाय, पोलिस उपनिरीक्षक यांनी आरोपीनां
अटक केलेली आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरेश जायभाय, पोलिस उपनिरीक्षक, सिंहगडरोड पोलिस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही अजय परमार सहा.पोलिस आयुक्त सिंहगडरोड विभाग पुणे शहर, राघवेंद्र क्षीरसागर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पो.स्टे. पुणे शहर, व उत्तम भजनावळे पोलिस निरीक्षक (गुन्हे) सिंहगडरोड पोलिस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शानाखाली सुरेश जायभाय पोलिस उपनिरीक्षक, सिंहगड रोड पो.स्टे. पुणे शहर व पोलिस हवालदार ६७१८ गिरीगोसावी, पोलिस हवालदार /७७६० मालुसरे व पोलिस शिपाई /१०१३८ सागर यांनी केलेली आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…

लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ने केले गजाआड…

पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…

पुणे पोलिसांनी अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरारी आरोपीला अटक केली आहे

The post मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka