Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे.

मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे.

भोपाळ (मध्य प्रदेश): मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने मित्रांसोबत मिळून मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदूर येथे घडली आहे. पोलिसांनी हत्येनंतर 12 तासांच्या आत खूनाचा तपास करत सहा आरोपींना अटक केली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

विदुर नगरमध्ये रूपसिंह राठोरचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर समजले की, रूपसिंहची हत्या त्याचा भाचा शुभम (वय २२) याने केली आहे. पोलिसांनी भाच्यासोबतच हत्येत सहभागी त्याच्या चार मित्राना आणि मामीलाही अटक केली. या हत्येचा खुलासा मृत व्यक्तीच्या सहा वर्षाच्या मुलाने केला. शुभम आणि मृत व्यक्तीची पत्नी पूजा म्हणजे मामी यांच्या प्रेमसंबंधातून हत्याची झाल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या भाच्यात अनैतिक संबंध होते. भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन मामाची हत्या केली. 12 तासांनंतर घटनेचा खुलासा करत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन आरोपी आहेत. मामी आणि भाच्याने उशीने तोंड दाबत मामाची हत्या केली होती. नंतर मृतदेह नाल्याच्या बाजूला फेकला होता. नातेवाईकांसोबतच त्याच्या सहा वर्षीय मुलाची चौकशी केली. यादरम्यान शंका आली की, हा अपघात नसून हत्या आहे. पोलिसांनी पूजाचा मोबाईल तपासल्यानंतर लक्षात आले की, पूजाने शुभमला अनेक व्हिडीओ कॉल केले होते. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. हत्येनंतर दोघे पळून जाण्याचा विचारात असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले आहे.’

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

प्रेमविवाहानंतर गावातील युवकासोबत सुरू झाले प्रेमसंबंध अन् पुढे…

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…

चुलती झोपली असताना हळूच पुतण्या आला अन्…

The post मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka