Dailyhunt
मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मिळालं मोठं घबाड.

मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मिळालं मोठं घबाड.

हिंगोली : राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्या 2 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास अडीचशेपेक्षा जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. हिंगोली शहरात एका बॅगमध्ये मोठी रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये आढळून आले आहेत.

हिंगोली शहरांतील शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या पथकाने चार चाकी गाडीमधून एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या चार चाकी गाडीची तपासणी केली असता, त्यात बॅगमध्ये मोठी रक्कम आढळून आली. या बॅगमधील संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली ही रोकड एका खासगी व्यापाऱ्याची असल्याची माहिती मिळत असून कॅश बाळगण्याबाबत आमच्याकडे परवानगी असल्याचे संबंधित व्यक्तीने म्हटले आहे. मात्र, निवडणूक विभागाच्या वतीने संबंधित रोकड पडताळणी आणि प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने ताब्यात घेण्यात आली असून रोकड मोजली जात आहे. तसेच, कारमधील व्यक्तींकडून संबंधित कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे. या संपूर्ण रोकडची तपासणी व प्राथमिक चौकशी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत. मात्र, निवडणूक काळात मतदानाच्या आदल्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…

अभियंत्याच्या घरावर धाड टाकताच मिळालं मोठं घबाड…

पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन् मिळालं मोठं घबाड…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka