भुवनेश्वर (ओडिशा): राज्य सरकारचे मुख्य अभियंता बैकुंठ नाथ सारंगी यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी एकाचवेळी Vigilance विभागाने धाड टाकली. या कारवाईदरम्यान तब्बल 2.1 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई सारंगी यांच्या जाहीर संपत्ती आणि त्यांच्या उत्पन्नात दिसून आलेल्या संशयास्पद फरकाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.
दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच, बैकुंठनाथ सारंगी यांनी घाबरून त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून 500 रुपयांच्या नोटांची बंडलं खाली फेकली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खिडकीतून फेकलेल्या या नोटा दक्षता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्या. उत्पन्नाच्या तुलनेत अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी सारंगी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी ओडिशा दक्षता विभागाचे 8 उपअधीक्षक (डीएसपी), 12 निरीक्षक, 6 सहाय्यक निरीक्षक (एएसआय) आणि इतर कर्मचारी सहभागी होते. भुवनेश्वर, अंगुल आणि पीपली येथील सारंगी यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. अंगुलच्या विशेष दक्षता न्यायाधीशांनी सर्च वॉरंट जारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
बैकुंठनाथ सारंगी केवळ दोन दिवसांनंतर सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या कार्यालयातही सध्या शोधमोहीम सुरू आहे. ही कारवाई केवळ प्रारंभिक टप्प्यात असून छापेमारी अद्याप पूर्ण झालेली नाही, अशी माहिती दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सारंगी यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याच आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
दक्षता विभागाने बैकुंठनाथ सारंगी यांच्याविरोधात छापेमारी करताना अंगुलमधील करदागडिया परिसरातील दुमजली घर, भुवनेश्वरच्या डुमडुमा भागातील पीडीएन एक्झॉटिका इमारतीतील फ्लॅट नंबर C-102, पुरी जिल्ह्यातील पीपली येथील सिऊलामधील फ्लॅट, अंगुलमधील शिक्षकपडा परिसरातील नातेवाईकांचे घर, लोकेपासी गावातील वडिलोपार्जित घर, मटियासाहीमधील दुमजली वडिलोपार्जित इमारत आणि भुवनेश्वरमधील आरडी प्लानिंग अँड रोड विभागातील मुख्य अभियंत्यांचे कार्यालय अशा एकूण सात ठिकाणांवर एकाचवेळी धाड टाकली आहे.
पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन् मिळालं मोठं घबाड…
तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट! महिलेकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड…
मोठं घबाड! जंगलात कारचा दरवाजा उघडला अन् सोनं, पैसे पाहून पोलिसही चक्रावले…
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…
क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी…
The post अभियंत्याच्या घरावर धाड टाकताच मिळालं मोठं घबाड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

