Dailyhunt
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा.

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा.

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखीच घट्ट झाला आहे. वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

न्यायालयात त्याला आज (मंगळवार) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर, कराडच्या वकिलाने विरोध केला. न्यायालयातील सुनावणीत कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हा आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यामुळे वाल्मिक कराडला दिलासा मिळेल अशी शक्यता होती. मात्र, एसआयटीने कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला असून कराडचा ताबा मागितला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराडलाही आरोपी करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केल्यानुसार आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संघटीत गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाकडून त्यास पुन्हा सीआयडी कोठडी सुनावण्यात येईल. या सीआयडी तपासात मकोकासंदर्भाने तपास केला जाईल, ज्यामध्ये 302 अंतर्गत दाखल झालेल्या संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

दरम्यान, मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मकोकाअंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करावा लागतो. ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यामुळे, मकोका अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.

खुनाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आलेले नाही, त्यामुळे मकोका लावण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे, आम्ही वाल्मिक कराडसंदर्भाने न्यायालयीने प्रक्रियेला समोरे जाऊ असे, वाल्मिक कराडचे वकील अॅड. सिद्धेश्वर ढोंबरे यांनी म्हटले आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, जामिनासाठी अर्ज करता येणार आहे, त्यानुसार आम्ही जामीनासाठी अर्ज केला असून पुढील 2-3 दिवसांत जामीन अर्जावर सुनावणी होईल, असेही अॅड. ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

The post मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka