नवी दिल्ली : बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचे समोर आले.
पुजा खेडकर यांनी २०२१ मध्ये युपीएससीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत पूजा खेडकर यांनी ऑल इंडिया रँक ८२१ होती. स्वत:ला दिव्यांग असल्याचेही सांगितले होते. युपीएससीला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खेडकर यांनी आपल्याला दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचे सांगितले. कमी गुण असूनही वंचित उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे पूजा खेडकर आयएएस बनू शकल्या.
दरम्यान, पूजा खेडकर या त्यांच्या खासगी ऑडी कारवर अंबर दिवा दिल्यामुळे आणि महाराष्ट्र सरकारचे चिन्ह लावून फिरल्यामुळे वादात अडकल्या आहेत. स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचे सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून कशा फिरतात? असा प्रश्न विचारला जात आहे. आता एमबीबीएसचा प्रवेश घेताना सुद्धा आरक्षणाची सवलत घेतल्याचे समोर आले आहे.
The post मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

