Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या.

MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या.

ळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अपयश आलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्क्दायक घटना शिरसोली येथे घडली आहे. आकाश भिमराव बारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

तीन गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे.

एमपीएससीच्या क्लर्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने आकाशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आकाश गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. गुरुवारी रोजी एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या मंत्रालयीन क्लर्क पदासाठीचा परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये आकाशला तीन गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली. या अपयशामुळे नैराशातून आकाशने रात्री त्याच्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाशच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

The post MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka