Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू.

मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू.

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. वांद्रे परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने युवतीला चिरडले आहे. मॉडेल शिवानी सिंग (वय २५) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

शिवानी ही तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना पाठी मागून आलेल्या एका टँकरने तिला चिरडले. या अपघातानंतर टँकर चालक फरार झाला.

वांद्रे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. तेव्हा भरधाव वेगाने येणारा पाण्याचा टँकर समोरून आला आणि त्याने दुचाकीला धडक दिली. शिवानी बाईकवर मागे बसली होती. टँकरची धडक बसताच शिवानी दुचाकीवरून पडली आणि टँकरच्या चाकाखाली आली. या घटनेत गंभीर जखमी झाली होती. नागरिकांनी तिला तात्काळ भाभा रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघात झाल्यानंतर टँकर चालकाने उडी मारून पळ काढला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, शिवानी सिंग हिने करिअरला नुकतीच सुरुवात केली होती. शिवानीने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. तिच्या करिअरमधला हा पहिला आंतरराष्ट्रीय शो होता. बिग बॉस ओटीटी-2 ची स्पर्धक आशिका भाटियानेही शिवानीच्या मृत्यूबद्दल पोस्ट केली आहे.

The post मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka