Dailyhunt
मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार.

मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार.

मुंबई : मुंबईत सीएसएमटी स्थानक परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो गुन्हा तपासासाठी एम आर ए मार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सीएसएमटी परिसरात असलेल्या टॅक्सी स्टँडच्या मागे बुधवारी (ता. २) रात्री १२ च्या सुमारास बलात्काराची ही घटना घडली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर महिलेला एका सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले होते.

महिलेबाबत चौकशी करण्यासाठी एम आर ए मार्ग पोलिस सामाजिक संस्थेत गेले होते. पण महिला तिथून निघून गेली असल्याची माहिती समोर आली. पीडितेने जबाब दिल्यानंतर ती पुन्हा समोर आलेली नाही. यामुळे तपासात आवश्यक ती माहिती मिळत नाही. पोलिस महिलेचा शोध आहेत. तर गुन्ह्याचा तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरू केला आहे.

The post मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka