Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी.

मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी.

मुंबईः विक्रोळी येथे एका अल्पवयीन प्रेमियुगलाने धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय 15 असून मुलाचे वय 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रविवारी (ता. 26) दुपार ही घटना घडली आहे. पंधरा वर्षीय मुलगी ही परप्रांतीय असून मुलगा हा महाराष्ट्रातील रहिवाशी आहे. दोघेही भांडुपच्या हनुमान नगर परिसरातील रहिवासी होते. घटना घडली त्यावेळी ही मुलगी आपल्या आजीसोबत बाहेर गेली होती. मात्र, मधूनच ही मुलगी आजीपासून बाजूला झाली. त्यानंतर ती गायब असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांतर्फे शोधाशोध केली असता रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याने हे प्रकरण आज उजेडात आले आहे. परिणामी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka