नागपूर : नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून, 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्स जप्त केला आहे. 8 कोटी 81 लाख रुपये एवढी या जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आहे.
अमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तस्कर हा तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील रहिवासी आहे. हा 45 वर्षीय व्यक्ती युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेची फ्लाइट क्र QR-590 ने पहाटे नागपूर विमानतळावर आला होता. कस्टमच्या अधिकाऱ्यांना ड्रग्स तस्करीबाबत आधीच माहिती मिळाली होती.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ड्रग्सचा मोठा साठा आढळून आला. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीकडून तब्बल 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे. 8 कोटी 81 लाख रुपये एवढी या जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
The post नागपूरच्या विमानतळावरून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

