Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार.

नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार.

नागपूर : नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या शेजारच्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपी धनीराम वासनिक (वय ५५) याला बेड्या ठोकल्या आहेत.

चल तुला चॉकलेट देतो, असे सांगत आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि तिथेच तिचा गैरफायदा घेतला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलगी घाबरली आणि तिथून निघून आली.

घाबरलेल्या पीडिते मुलीने सर्वात प्रथम आपलं घर गाठलं आणि त्यानंतर सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईनं तात्काळ पोलिस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपी पोलिस कोठडीत असून त्याचा कठोर शिक्षा व्हावी म्हणून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka